मुंबई : इंग्लंडमध्ये सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती बेकायदेशीर आहे. याचा फटका मुंबईत सरोगसीच्या माध्यमातून कन्याप्राप्त झालेल्या ब्रिटिश दाम्पत्याला बसला आहे.


क्रिस आणि न्यूमेन या दाम्पत्याने सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीला जन्म दिला होता. मात्र आता मुंबईमधून बाळ इंग्लंडला घेऊन जाण्यात अडचणी येत आहेत.


क्रिस आणि न्यूमेन यांचा व्हिसा 7 ऑक्टोबरला संपणार आहे. सरोगसीच्या माध्यमातून जन्म झालेल्या लिलीसाठी 3 जून रोजीच पासपोर्टचा अर्ज करण्यात आला होता. मात्र 7 ऑक्टोबरपर्यंत तो मिळणं शक्य नसल्याचं सांगण्यात येत आहे.


इंग्लंडमध्ये सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती बेकायदेशीर आहे. त्यामुळे ब्रिटीश दुतावास पासपोर्टबाबत काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे.


या मुलीसाठी क्रिस आणि न्यूमेन यांना भारतात स्थायिक व्हावं लागेल किंवा तिला अनाथालयात ठेवावं लागेल. सध्या या चिमुरडीचं भविष्य ब्रिटीश गृहमंत्रालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.