लंडन : काही वर्षांपूर्वी अभिनेता अंकुश चौधरीचा 'इश्श्य' नावाच्या सिनेमानं मराठी चित्रपटसृष्टीत मोठी धमाल उडवून दिली होती. या सिनेमात अंकुश चौधरीला गर्भधारणा झाल्याचं दाखवलं होतं. पण ब्रिटनमध्ये असाच प्रकार घडला असून, ब्रिटनमध्ये एका 21 वर्षीय पुरुषानं मुलीला जन्म दिला आहे.

2017 च्या सुरुवातीला एका स्पर्म डोनरच्या मदतीनं या तरुणाला गर्भधारणा झाल्याची घोषणा करण्यात आली होती. या घटनेनंतर गर्भधारणा झालेला हायडेन क्रॉसची जगभर सर्वत्र चर्चा झाली. क्रॉसने 16 जून रोजी ब्रिटनमधल्या ग्लॉस्टर शायर रॉयल रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला.

लिंग परिवर्तनाद्वारे क्रॉसला महिलेपासून पुरुष बनवण्यात आलं. तीन वर्षांपासून तो पुरुषाचं जीवन आनंदानं जगत आहे.

दरम्यान, ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेनं (NHS) क्रॉसला आपले स्पर्म फ्रिज करण्यास नकार दिला होता. ज्यासाठी त्याला 4000 पाऊंड खर्च करावा लागतो. यामुळे लिंग परिवर्तन प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नव्हती.

लिंग परिवर्तनाच्या प्रक्रियेदरम्यानच क्रॉसला फेसबुकवरुन स्पर्म डोनर मिळाल्यानंतर त्याने गर्भधारणा केली. आणि 16 जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण मुलीच्या जन्मानंतर क्रॉसला आता लिंग परिवर्तनाच्या प्रक्रिया पूर्ण करायची आहे.