Britain Political Crisis : बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषि सुनक आघाडीवर आहेत. भारतीय वंशाचे ऋषि सुनक (Rishi Sunak) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यास ही भारतासाठी अभिमानाची बाब ठरू शकते. ब्रिटीश मीडियानुसार ऋषि सुनक ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 


बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा 
ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी मंगळवारी राजीनामा दिला. दोन्ही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर खुर्ची सोडण्याचा दबाव वाढला आणि त्यानंतर जॉन्सन यांनी अखेर गुरुवारी राजीनामा दिला.


कोण आहेत ऋषि सुनक?
ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे होते. पण त्याचं कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आले होते. त्यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. स्टॅनफोर्ड विद्यापीठातीन एमएचं शिक्षण घेतलं. ऋषी सुनक इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. मुलगी अक्षतासोबत लग्न केले आहे. 2015 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. 


ऋषी सनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड का होऊ शकते?


ऋषी सुनक यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांनी कोरोनाच्या चांगलं काम केलं आहे. कोरोनाच्या काळात ऋषी सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं. सर्व विभागांना खूश करण्यात ऋषी सुनक यशस्वी ठरल्याने त्याचे कौतुकही होत आहे. याशिवाय सरकारमधील ऋषी सुनक एक महत्त्वाचा चेहरा होते. अनेक प्रसंगी, ऋषी यांनी बोरिसऐवजी टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये भाग घेतला. त्यामुळेच भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


महत्वाच्या बातम्या :