Japan Former PM Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. जपानच्या नारा शहरात शिंजो आबे भाषण करत असताना बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज आला आणि ते खाली कोसळले. एनएचके चॅनलच्या रिपोर्टरने गोळीचा आवाज ऐकू आल्याचं म्हटलंय. शिंजो आबे खाली पडल्यानंतर ते रक्तबंबाळ झाल्याचं दिसलं. त्यामुळे गोळीबारातच शिंजो आबे जखमी झाले असावेत असं वृत्त समोर येत आहे.


भाषणादरम्यान गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती


जपानच्या नारा शहरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. जपानच्या वृत्तसंस्था एनएचकेनुसार शिंजो आबे यांच्यावर भाषणादरम्यान गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दुसऱ्या एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पश्चिम जपानमध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं भाषण सुरु होतं. यावेळी ते अचानक खाली कोसळले. त्यावेळी शिंजो आबे जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.






दोन हल्लोखोर अटकेत
जपानची वृत्तसंस्था द जपान टाईम्सच्या वृत्तानुसार, गोळीबारात शिंजो आबे जखमी झाले आहेत. आबे यांनी दोन गोळ्या लागल्याची माहिती आहे. त्यांना छातीत एक गोळी लागली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. 


आजारपणामुळे दिला होता पंतप्रधान पदाचा राजीनामा
शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिंजो आबे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करत या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.






 


महत्त्वाच्या इतर बातम्या