इस्लामाबाद : दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पाकिस्तान हादरलं आहे. या दोन्ही बॉम्बस्फोटात 62 जणांचा मृत्यू, तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. हे दोन्ही बॉम्बस्फोट शिया बहुल भागात झाल्याची माहिती आहे.


पश्चिम पाकिस्तानातील परचिनार शहरात झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात 15 जण ठार झाले असून 70 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तर काल सकाळी क्वेट्टा शहरात झालेल्या स्फोटात 11 जण ठार झाले होते.

हो दोन्ही स्फोट बाजारपेठेत झाले असून त्यावेळी इफ्तारसाठी लोक खरेदी करत होते. मृत पावलेल्यांमध्ये 3 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर कराचीमध्ये दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.

या घटनेनंतर गुप्तहेर यंत्रणेनं दहशतवांद्यांविरोधात मोहीम सुरु केली आहे. पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितलं की, या घटनांनतर देशभरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

क्वेट्टामधील हल्ल्याची जबाबदारी आयसिसशी संबंधित जमात-उव-अहरार या स्थानिक संघटनेनं स्विकारली आहे. जमात-उल-अहरार ही संघटना तहरीक-ए-तालिबानपासून वेगळी होऊन स्थापन झाली होती.