136 प्रवाशांना घेऊन जाणारं बोईंग विमान फ्लोरिडामधील नदीत कोसळलं
एबीपी माझा वेब टीम | 04 May 2019 10:06 AM (IST)
अमेरिकेतल्या फ्लोरिडामधील सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग 737 हे प्रवासी विमान कोसळले.
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेतल्या फ्लोरिडामधील सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग 737 हे प्रवासी विमान कोसळले. लँडिंग करत असताना विमान रनवेवरुन घसरुन ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 136 प्रवाशांना घेऊन हे विमान क्यूबाहून अमेरिकेला जात होते. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले. तसेच विमानातील सर्व प्रवाशांना चेक अप करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.