नवी दिल्ली : अत्यंत मानाच्या अशा जागतिक कीर्तीच्या रेमन मॅगसेसे पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 2016 सालच्या मॅगसेसे पुरस्काराने टीएम कृष्णा आणि बेजवाडा विल्सन या भारतीयांचा गौरव करण्यात आला आहे.

 
कर्नाटकातील संगीतकार टीएम कृष्णा आणि मानवाधिकार कार्यकर्ते बेजवाडा विल्सन यांना बहाल करण्यात येणार आहे. बेजवाडा विल्सन यांचा जन्म कर्नाटकातील एका दलित कुटुंबात झाला होता. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची दखल घेण्यात आली आहे.

 
चेन्नईत जन्मलेले टीएम कृष्णा कर्नाटकी संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. संस्कृतीत सामाजिक एकरुपता कायम राखलं आहे, या कार्याची दखल घेण्यात आली आहे. कृष्णा सध्या रशियामध्ये स्थायिक आहेत.

 

 

काय आहे रेमन मॅगसेसे पुरस्कार ?


 

 

फिलीपिन्सचे माजी राष्ट्रपती रेमन मॅगसेसे यांच्या नावाने या पुरस्कारांचं वितरण केलं जातं. निस्वार्थ सेवेसाठी आशियातील व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. विल्सन आणि कृष्णा यांच्या व्यतिरिक्त फिलीपिन्स, इंडोनेशिया, लाओस आणि जपानमधील चार लेखकांनाही हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

 

 

आतापर्यंत विनोबा भावे, प्रकाश आणि मंदा आमटे, सत्यजित रे, मदर तेरेसा, अरुण शौरी, रवी शंकर, अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांसारख्या भारतीयांचा मॅगसेसे पुरस्काराने गौरव झालेला आहे.