कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असं ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोहिनूर पुन्हा मायदेशी परत येण्याच्या शक्यता मावळल्या आहेत.
इंग्रजांनी कोहिनूर भारतातून लुटून किंवा चोरुन नेला नव्हता, तर 19 व्या शतकात पंजाबच्या राजानं ब्रिटनच्या महाराणीला तो भेट म्हणून दिला होता. त्यामुळे कोहिनूर परत करण्याची मागणी आपण इंग्लंडकडे करु शकत नाही. असं केंद्र सरकारनं 4 महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं होतं. त्यामुळे कोहिनूर भारतात येण्याची आशा धूसर होत चालली आहे.
संबंधित बातम्या:
कोहिनूर परत भारतात आणू- केंद्र सरकार
'कोहिनूर भारतात परत आणणं अशक्य', केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती
भारताचा कोहिनूर हिरा ब्रिटनकडून पाकला हवा, लाहोर कोर्टात याचिका