China Heavy Rain : चीनमध्ये (China) भीषण पूरस्थिती निर्माण झाली असनू राजधानी बीजिंगमधील (Beijing) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. चीनमध्ये 140 वर्षांनंतर चीनमध्ये (China Flood) भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीजिंगमध्ये मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) 20 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील स्थानिक माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. तर, 52,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
चीनला भीषण पुराचा विळखा
चीनमधील अनेक शहरांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राजधानी बीजिंगसह अनेक मोठी शहरे पाण्याखाली गेली आहेत. 140 वर्षांपूर्वीही चीनने अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला होता. त्यानंतर आता 140 वर्षांनंतर चीनवर ही भीषण नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे.
बीजिंगमध्ये 20 जणांचा मृत्यू
बीजिंगमध्ये मुसळधार पावसामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे, चीनच्या राज्य माध्यमांच्या रिपोर्टनुसार, मुसळधार पाऊस चौथ्या दिवशी कोसळत आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत आणखी 27 लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. डोक्सुरी वादळामुळे उत्तर चीनमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून भीषण पूर आला आहे. द गार्डियन वृत्तपत्राने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे.
140 वर्षानंतर भीषण पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत
बीजिंग हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 744.8 मिमी पावसामुळे वांगजियायुआन जलाशय भरलं आहे. पावसामुळे आतापर्यंत 20 जणांना जीव गमवावा लागला असून 27 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत.
पाहा व्हिडीओ : अतिवृष्टीमुळे चीनमध्ये पुराचा हाहाकार
पुरामुळे लाखो लोक बेघर
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सर्व स्थानिक प्रशासनांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. बीजिंगमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला असून, हेबेई प्रांतात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. चोंगकिंगमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.
लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सरकारचा प्रयत्न
लिओनिंगमध्ये पूरग्रस्त भागातून सहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यापूर्वी 1998 मध्ये चीनमध्ये भीषण पूर आला होता. ज्यामध्ये 4200 लोकांचा मृत्यू झाला. यांगत्झी नदीच्या पुरामुळे बहुतेकांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये हेनान प्रांतात आलेल्या पुरात 300 लोकांचा मृत्यू झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :