वॉशिंग्टनमधील लहान मुलांसोबत त्यांनी जवळपास अर्धा तास धमाल केली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
या भेटीमुळे लहान मुलं चांगलीच खूश झाली. त्यानंतर थोड्याच वेळात सांतक्लॉजच्या रुपातला बराक ओबामांचा व्हिडीओही ट्विटरवर पोस्ट करण्यात आला.
ओबामा यांनीही लहान मुलांसोबतचा फोटो रिट्विट करत आपण हे क्षण खूप आनंदाने साजरे केले असे म्हटलं आहे. दरम्यान, ओबामांच्या या हटके प्रयोगाचं नेटकऱ्यांनीही स्वागत केले आहे. सॅन्ताक्लॉजच्या वेशातील त्यांचा फोटो लाखो यूजर्सनी रिट्वीट केला आहे.