वॉशिंगटन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन आभार मानले. आपल्या कार्यकाळात भारत आणि अमेरिकामधील संबंध आणखी सुधारल्याबद्दल ओबामांनी मोदींना फोन करुन थँक्यू म्हटलं.
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांचा दुसरा कार्यकाळ आज संपणार आहे. तर डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतील.
बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांच्यात बुधवारी फोनवर बातचीत झाली. या संभाषणादरम्यान, मोदींच्या कार्यकाळादरम्यान संरक्षण, नागरी अणुऊर्जा तसंच दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्परसंबंध वाढवण्यावर भर दिल्याने ओबामांनी मोदींचे आभार मानले.
"2015 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावल्याच्या आठवणींना ओबामांनी उजाळा दिला. तसंच पंतप्रधान मोदींना भारताच्या आगामी 68 व्या प्रजासत्ताक दिनासाठी आधीच शुभेच्छा दिल्या," असं व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आलं आहे.