Bangladesh Election Ukraine-Germany Hacker Attack: नवी दिल्ली : बांग्लादेशच्या (Bangladesh) पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचा पाचव्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर विरोध पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या निवडणुकीत शेख हसीना यांच्या पक्षाला 300 पैकी 200 जागांवर विजय मिळालाय. तर शेख हसीना स्वत: 2 लाख 49 हजार 496 मतांनी विजय मिळवला आहे.


बांग्लादेशमध्ये शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. पाचव्यांदा शेख हसीना पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगनं 300 जागांपैकी दोनतृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. 2009 पासून बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच आहे. त्यापूर्वी 1991 ते 1996 या काळात शेख हसीना पंतप्रधान होत्या.


आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगनं 300 संसदीय जागांपैकी 224 जागा जिंकल्या आहेत. बांगलादेश राष्ट्रीय पक्षानं चार जागा जिंकल्या आहेत. अपक्षांनी 62 जागा जिंकल्या आहेत, तर इतरांनी एक जागा जिंकली आहे. दरम्यान, उर्वरित दोन जागांसाठी अजूनही मतमोजणी सुरू आहे.


शेख हसीना त्यांचा लोकसभा मतदारसंघ गोपालगंज-3 मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या. त्यांना 2,49,965 मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी एम. निजामउद्दीन लष्कर यांना अवघी 469 मतं मिळाली. शेख हसीना 1986 पासून आठव्यांदा गोपालगंज-3 मधून निवडणूक जिंकल्या आहेत. दरम्यान, शेख हसीना बांग्लादेशमध्ये सर्वाधिक काळापासून पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा रेकॉर्ड केला आहे.