ढाका : बांगलादेशच्या ढाक्यात विमानाच अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे. सुदैवानं हा प्रयत्न सुरक्षायंत्रणांना हाणून पाडण्यात यश आलं आहे. बांगलादेश एअरलाईन्स कंपनीचं हे विमान आहे. दरम्यान विमान अपहरण करणाऱ्या व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एक क्रू मेंबर जखमी झाला आहे. या घटनेनंतर विमानाचं चितगोंगमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ढाक्याहून दुबईला निघालेल्या विमानात रविवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. विमानातील एक व्यक्तीने अचानक क्रू मेंबरवर बंदूक रोखली आणि प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्याचे आदेश दिले. दरम्यान या व्यक्तीन विमानाच्या कॉकपिटमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच विमानाचं चितगोंगमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानात एकूण 145 प्रवासी प्रवास करत होते, हे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे.