आजकाल लॉटरीच्या (Lottery) नावाखाली फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही लोक त्यात अडकतात, तर काहीजण असे कॉल्स दुर्लक्षित करतात. अशातच बरेच लोक असे ही असतात जे लॉटरीची तिकीट खरेदी करतात आणि विसरतात. त्यांना आपण लॉटरी जिंकू शकतो, असा विश्वास नसतो. तरीही ते लॉटरी खरेदी करता. असेच काहीसे एका ऑस्ट्रेलियन महिलेसोबत (Australian Woman) घडले. या महिलेला लॉटरी लागल्यानंतर (Woman Won Lottery) फोन आला. मात्र तिच्या एका चुकीमुळे तिला 1 लाख ऑस्ट्रेलियन डॉलरला (भारतीय चलनात 50 लाख रुपये) मुकावं लागलं आहे.
ऑस्ट्रेलियातील फ्रेंच फॉरेस्ट ऑफ न्यू साउथ वेल्समधील एका महिलेने 25 फेब्रुवारी रोजी thelott.com वर लकी लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती. मात्र लॉटरी काढल्यानंतर याबद्दल माहिती गोळा करण्यास ती विसरली. या संदर्भात महिलेला अनेक फोन आले, पण हा काही फसवणुकीचा प्रकार असल्याचे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. लॉटरी अधिकार्यांकडून आलेला फोन हा फसवणुकीचा प्रकार आहे, असा गैरसमज त्यांना सुरुवातीला अनेक दिवस होता.
लॉटरी वेबसाईटवर लॉगइन केल्यावर बसला धक्का
लॉटरी जिंकलेल्या महिलेने 'द लॉट'ला सांगितले की, सोडतीनंतर काही वेळातच तिला काही फोन कॉल्स आणि ईमेल आले होते. पण हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा त्यांचा समज झाला. मात्र नक्की हे काय आहे, हे त्या ओळखू शकल्या नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात कोणतेही उत्तर दिले नाही किंवा कोणतीही दखल घेतली नाही. या महिलेने सांगितलं की, त्यांनी काही दिवस फोन कॉल्स आणि ईमेलकडे दुर्लक्ष केले. यानंतर त्यांनी शेवटी त्यांच्या ऑनलाइन द लॉट खात्यात लॉगइन करण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, लॉटरीच्या या वेबसाईटमध्ये लॉगइन केल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना नंतर कळलं हे कॉल्स जे त्यांना येत होते, ते खरे होते. या महिलेला ही लॉटरीची रक्कम मिळाली असून ही रक्कम आता कशी खर्च करावी, याचा त्या विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : 'यूक्रेनमध्ये मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करा', महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे निर्देश
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याबाबत कोणताही करार नाही, लवकरच चर्चेच्या तिसऱ्या फेरीची शक्यता
- Russia Ukraine War: युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप; मदतीसाठी सरसावणार!