नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये जवानांच्या गोळीबारात ठार झालेल्या हिजबुलचा कमांडर बुरहान वाणीबाबत आता नवा गौप्यस्फोट झाला आहे.


बुरहान वाणी आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी  हाफिज सईद यांचे संबंध होते, हे आता उघड झालं आहे.

हाफिज सईद आणि बुरहान वाणी यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ टेप एका टीव्ही चॅनेलने प्रसिद्ध केली आहे.

त्यामुळे बुरहान वाणीला शहीद घोषीत करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा आणखी एकदा फाटला आहे.



काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांसाठी बुरहान वाणी हा हाफिज सईदकडून पैसे, हत्यारे आणि मार्गदर्शन घेत होता, असं या ऑडिओ टेपमधून उघड झालं आहे.

बुरहान वाणी हा भारतावरील हल्ल्यासाठी हाफिज सईदकडून आशिर्वाद मागत होता, असं या टेपमधून स्पष्ट होत आहे.  वाणी सातत्याने भारतीय जवानांचा दुश्मन असाच उल्लेख करत होता.

या संवादावरुन बुरहान वाणी हा दहशतावदी कारवायांमध्ये सहभागी नव्हता असा दावा करणाऱ्यांना चपराक बसली आहे. तसंच वाणी हा दहशतवादीच होता, हे स्पष्ट होत  आहे.

भारतीय जवानांनी 8 जुलैला काश्मीर खोऱ्यात बुरहान वाणीचा खात्मा केला होता. त्यानंतर काही दिवस काश्मीर खोरं अशांत होतं.  पाकिस्तानने बुरहान वाणीला शहीदाचा दर्जा दिला होता.

बुरहान आणि हाफिज सईदचा संपूर्ण संवाद

ऑडिओ टेपमधील काही संवाद

दहशतवादी - क्या हाल है?

बुरहान - जी खैरियत है, बस आपकी दुआ होनी चाहिए

दहशतवादी - बात करनी थी पीर साहिब (हाफिज सईद) से न?

बुरहान - जी -जी बात करनी थी

हाफिज सईद - अस्सलामोअलैकुम

बुरहान - व-अलैकोमुस्सलाम, आप कैसे है?

हाफिज सईद- माशाल्लाह, बुरहान भाई बोल रहे है?

बुरहान - जी-जी बुरहान ही बोल रहा हूं. आप ठीक है?

हाफिज सईद - अल्लाह का बहुत शुक्र है. मुझे आपसे बात कर बहुत खुशी हुई है. अल्ला आपको दीन की खिदमत का मौका दे

बुरहान - जी हमें भी बहुत तमन्ना थी आपसे बात करने की. बाकी आपकी सेहत ठीक है?

हाफिज सईद - अल्लाह का एहसान है. आप परेशान मत होना. हम आपके साथ खडे है. आपको जो चाहिए हमसे कहे. हम हर खिदमत के लिए खडे है.