नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) भारताच्या श्रीलंका (IND vs SL) दौऱ्याबाबत मोठी घोषणा केली आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्यामध्ये बदल करण्यात आला आहे. भारताचा श्रीलंका दौरा 26 जुलै ऐवजी 27 जुलैपासून सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 



रोहित शर्मानं  टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानं भारतीय संघाचं नेतृत्त्व हार्दिक पांड्याकडे दिलं जाण्याची शक्यता आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भारतीय  क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा 7 ऑगस्ट रोजी संपणार आहे. वेळापत्रकात थोडेफार बदल करण्यात आल्यानं कोणतीही मॅच रद्द करण्यात आलेली नाही किंवा स्टेडियम देखील बदलण्यात आलेलं नाही. 



नव्या वेळापत्रकानुसार टी 20 सामने आणि एकदिवसीय सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 






टी 20 मालिकेचं वेळापत्रक 


पहिली टी 20 मॅच : 27 जुलै
दुसरी टी 20 मॅच : 28 जुलै  
तिसरी टी 20 मॅच : 30 जुलै


टी 20 मालिकेचे तीन सामने पलेकेल्लेमध्ये होतील. तर एकदिवसीय सामने कोलंबोमध्ये होणार आहेत. 


एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक


पहिली मॅच :2 ऑगस्ट 
दुसरी मॅच : 4 ऑगस्ट 
तिसरी मॅच : 7 ऑगस्ट  



केएल राहुल एकदिवसीय सामन्यामध्ये कॅप्टन?


रोहित शर्मानं या मालिकेतून विश्रांती घेतल्यानं भारतीय संघाचा कॅप्टन म्हणून केएल.राहुल याला संधी दिली जाऊ शकते. एकदिवसीय  सामन्यांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या उपलब्ध नसल्यास के.एल. राहुलकडे नेतृत्त्वाची संधी दिली जाऊ शकते. 


 हार्दिक पांड्या देखील टी 20 सामन्यांसाठी उपलब्ध नसल्यास सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पद दिलं जाऊ शकतं. सूर्यकुमारनं यापूर्वी भारताचं नेतृत्त्व केलेलं आहे.  गौतम गंभीर  याची प्रशिक्षक पदी निवड झाल्यानंतर भारताचा पहिला दौरा आहे. 


रोहित शर्मा, विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर महत्त्वाचा दौरा 


रोहित शर्मा आणि  विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजानं निवृत्ती जाहीर केली होती. आगामी काळातील महत्त्वाच्या दौऱ्याची सुरुवात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यापासून करणार आहे. 


संंबंधित बातम्या :


Champions Trophy 2025: भारत चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेण्याची शक्यता, स्पर्धा कशी पार पडणार? 'या' संघाला लॉटरी लागणार