स्टॉकहोम : स्वीडनची राजधानी स्टॉकहोम शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर एका भरधाव ट्रकने अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे ही घटना घडली त्या ठिकाणापासून भारतीय दूतावास केवळ 200 मीटर अंतरावर आहे. भारतीय दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार सर्व भारतीय सुरक्षित आहेत. भारताच्या राजदूत मोनिका मोहता यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

दरम्यान हे दहशतवादी हल्ल्याचे संकेत आहेत. या घटनेप्रकरणी एक जणाला अटक करण्यात आलं आहे, अशी माहिती स्वीडनचे पंतप्रधान स्टेफान लोफवेन यांनी दिली आहे.

https://twitter.com/ANI_news/status/850351742508257280

स्वीडनची वृत्तवाहिनी एसव्हीटीच्या वृत्तानुसार गोळीबार झाल्याचाही आवाज आला होता. व्हिडिओमध्ये ट्रकच्या धडकेनंतर एकच गोंधळ उडाल्याचं चित्र दिसत आहे. या हल्ल्यानंतर शहरातील ट्रेन आणि मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे.