लंडन :  ब्रिटनमध्ये  Oxford-AstraZeneca ची कोरोनाची लस घेतल्यानंतर सात जणांना आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आल्यानंतर आता या लसीचा लहान मुलांवर वापर करण्याचा निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मंगळवारी ऑक्सफर्डने ही माहिती दिली असून या लसीच्या डोसनंतर काही लोकांच्या रक्तात गाठी झाल्याच्या शक्यतेवर आता संशोधन सुरू असल्याचं स्पष्ट केलंय.


ऑक्सफर्ड विद्यापीठाने या बाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यामध्ये म्हटलंय की, लहान मुलांवर या लसीचा वापर करण्यात येणार होता. या लसीचा डोस घेतल्यानंतर लोकांच्या रक्तात गाठी होत असल्याच्या बातमीमुळे अनेकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे आता लहान मुलांच्यावरील करण्यात येणाऱ्या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे. ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर एजन्सीकडून त्यांनी केलेल्या अभ्यासाची अधिक माहिती कंपनीने मागवली आहे. 


चार दिवसापूर्वी ब्रिटनमध्ये  Oxford-AstraZeneca ची कोरोनाची लस घेतल्यानंतर सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही लस घेतल्यानंतर 30 जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आणि त्यापैकी सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर एजन्सीने दिली होती. 


WHO, युरोपचे ड्रग रेग्युलेटर आणि AstraZeneca यांनी स्वतः ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पुन्हा-पुन्हा सांगितले होतं. या लसीच्या वापरामुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. WHO ने देखील AstraZeneca क्लीन चिट देत सांगितलं होतं की, लस आणि रक्ताच्या गुठळ्या याचा कोणताही संबंध असलेली एकही केस आढळली नाही. फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनीने अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस वापरण्यास मनाई केली. या देशांनी असं म्हटले आहे की, लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची तक्रार केली आहे. फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनीने अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस वापरण्यास मनाई केली. या देशांनी असं म्हटले आहे की, लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची तक्रार केली आहे.


महत्वाच्या बातम्या :