Corona Vaccine : जगभरात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमात अग्रेसर असलेल्या अमेरिकेत आता आणखी एका कोरोनाच्या लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. ही नवीन लस अमेरिकन लष्कराने तयार केली असून ती कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून तसेच इतर स्ट्रेनेपासून पूर्णपणे सुरक्षा देत असल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे. 


बुधवारी अमेरिकेतल्या वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च या ठिकाणी लष्करी डॉक्टरांनी 72 स्वयंसेवकांना ही लस दिली आहे. या स्वयंसेवकांचे वय हे 18 ते 55 या दरम्यानचे आहेत. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे का याची खात्री करण्यात येणार आहे. मानवी चाचणीत ही लस यशस्वी झाली तर पुढच्या वर्षापर्यंत बाजारात आणली जाईल असं लष्कराच्या संशोधकांना सांगितलंय. 


या लसीचा विकास करताना करण्यात आलेल्या अभ्यासात असं सांगण्यात आलंय की ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून तसेच इतरही वेगवेगळ्या स्ट्रेनपासून सुरक्षा देते. आता या चाचणीत ही लस यशस्वी ठरली तर ती सामान्य नागरिकांना देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.  


गेल्या रविवारपर्यंत, 32 टक्के अमेरिकन लोकांना कोरोना लसीचा किमान एक तरी डोस देण्यात आला आहे तर 19 टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकेचा जगात प्रथम क्रमांक लागतोय. 


जो बायडेन प्रशासनाने अमेरिकेतल्या लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शक्य तितक्या कोरोना लसींच्या चाचणीला परवानगी देण्याची भूमिका प्रशासनाची आहे. अमेरिकेतली फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशन ही संस्था कोणत्याही लसीच्या वापराला परवानगी देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. कोरोनाच्या लसीला परवानगी देताना ती लस सुरक्षित आहे का आणि किती प्रभावी आहे हे प्रामुख्याने पाहिलं जातं.


महत्वाच्या बातम्या :