वॉशिंग्टन: अमेरिकेच्या पीटर्सबर्ग सिनगॉगमध्ये शनिवारी ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाबाहेर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या दुर्दैवी घटनेत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 12 जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या 46 वर्षीय बंदूकधाऱ्याचं नाव रॉबर्ट बॉवर्स असून तो सुद्धा जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी अटक केले आहे.


या घटनेबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट केले आहे. ट्रम्प यांनी हा गोळीबार भीषण असल्याचं सांगितलं. इतकी वर्षं झाली तरी अशा घटना सारख्या-सारख्या बघाव्या लागतं आहेत, हे लाजिरवाणं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.


अमेरिकेत यापूर्वी सुद्धा गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबाराबाबत नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी काही मार्ग बंद केले असून रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. घटनेतील आरोपी रॉबर्ट बॉवर्स सुद्धा जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

चार दिवसापूर्वी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी सेक्रेटरी ऑफ स्टेट अर्थात परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या नावानं आलेल्या टपालात स्फोटक सदृश पदार्थ समोर आल्यानं खळबळ उडाली होती.