Alito Circa : आयुष्यात कला महत्त्वाच्या, कारण आयुष्यात कला नसेल तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल. कोणत्याही चित्राचे मोल लावता येत नाही. आजवर अनेकदा रक्त व रक्ताची पत्र, चित्र चर्चेचा मुद्दा ठरली आहे, संघर्ष ते प्रेम अनेक पैलू असलेल्या या चित्रातून मांडता येतात. आज तुम्हाला अशाच एका कलाकाराविषयी सांगणार आहे जो चक्क स्वतःच्या रक्ताने चित्र काढतो. चित्र काढण्यासाठी तो वर्षभरात अंदाजे स्वत:चे दोन लिटर रक्त वापरतो. फिलिपाइन्समधील कॅनव्हास आर्टिस्ट एलिटो सर्काने हा पराक्रम केला आहे.
कोण आहे एलिटो सर्का?
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, एलिटो सर्का हा फिलीपिन्समधील एक कॅनव्हास कलाकार आहे ज्याने विश्वविक्रम करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचा वापर करून अनेक चित्रे तयार केली आहेत. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1970 रोजी झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी टोमॅटोचा वापर करून पेंटिंग्ज बनवल्या, पण जेव्हा त्याला वाटले की लोक त्याच्या पेंटिगकडे लक्ष देत नाहीत, तेव्हा त्याने स्वतःच्या रक्ताचा वापर करून चित्रे काढण्यास सुरुवात केली.
रक्ताने चित्रे का बनवतो?
जेव्हा लोकांनी एलिटो सर्काला विचारले की, तो रक्ताने चित्रे का बनवतो? तेव्हा त्याने उत्तर दिले, "जेव्हा मला दुखापत होते तेव्हा मी पेंटिंगमध्ये माझे रक्त वापरतो, कारण पेंटिंगमधील रक्ताचे डाग काढणे कठीण आहे. तसेच माझ्या पेंटिंग माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जर त्या माझ्या रक्ताच्या बनलेल्या असतील तर त्याचा अर्थ असा होतो की, त्या पेंटिंगमध्ये माझा डीएनए आहे. म्हणूनच मी माझ्या पेंटिंगमध्ये माझे स्वतःचे रक्त वापरतो.
पेंटिंगमध्ये फक्त स्वतःचे रक्त वापरतो
एलिटो सर्काला त्याच्या पेंटिंगमध्ये फक्त स्वतःचे रक्त वापरतो. यासाठी त्याला दर तीन महिन्यांनी त्याचे 500 मिली रक्त काढतो. म्हणजेच वर्षभरात एकूण 2 लिटर रक्त चित्रांसाठी वापरतो. आपल्या पेंटिंगमध्ये वापरण्यासाठी त्याने रक्त साठवण्यास सुरुवात केली आहे. तो आता रक्त काढतो आणि त्याच्या स्टुडिओत ठेवलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो.
तामिळनाडूच्या चित्रांवर बंदी
दिल्लीमध्ये शहीद स्मृती चेतना समिती नावाच्या एका संस्थेत रक्तापासून देशभक्तांची चित्र रेखाटली जातात. या संस्थेच्या अंतर्गत आजपर्यंत अडीचशेपेक्षा चित्रे बनवण्यात आली आहेत. दरम्यान चेन्नईच्या 20 वर्षाच्या एका तरूणाने आपल्या प्रेयसीच्या वाढदिवसासठी स्वतःच्या रक्ताने तिचे चित्र काढून गिफ्ट केले यासाठी जेव्हा हा तरूण एका स्टुडिओमध्ये पोहोचला तेव्हा त्याला रक्त द्यावे लागले. सध्या रक्ताचे पेंटिग देण्याची मोठी क्रेझ तरूणांमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये मागील काही काळात अशा चित्रांची भरपूर विक्री होत असल्याचे समजत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर तामिळनाडूमध्ये रक्ताचे चित्र काढण्याच्या स्टुडिओवर बॅन लावण्यात आले आहे. कोणत्याही संस्थेत किंवा स्टुडिओमध्ये अशा प्रकारे रक्ताची चित्र काढली गेली तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल