VIDEO : 93 वर्ष जुना ब्रिज तोडताना नाकी नऊ, स्फोटकंही अपुरी
एबीपी माझा वेब टीम | 13 Oct 2016 09:04 AM (IST)
न्यूयॉर्क : महाडमधील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाच्या दुर्घटननेनंतर राज्यातील जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तर दुसरीकडे अमेरिकेतला असाच एक जुना पूल पाडताना मात्र पूल पाडणाऱ्यांची दमछाक झाली. लिटल रॉकमध्ये अरकान्सास नदीवरचा 93 वर्षे जुना असलेला ब्रॉडवे ब्रिज पाडून तिथे नवीन आणि रुंद ब्रिज बांधायचा आहे. त्यामुळे हा पूल पाडण्यासाठी मंगळवारी तिथं नियंत्रित स्फोट घडवून आणले. जुना पूल असल्याने तो अवघ्या काही मिनिटांत कोसळणं अपेक्षित होतं, मात्र सर्व स्फोटकं संपली तरी पुलाला तडे जाऊनही तो पडला नाही. अखेर पाच तासांची मेहनत आणि आणखी काही स्फोटांनंतरच ब्रॉडवे ब्रिज पाडला गेला. पाहा व्हिडिओ :