हॉल कौंटी लॅण्डफिल साईटला 9 मार्च रोजी एका महिलेने कॉल करुन याबाबत माहिती दिली. यानंतर कचरा उपसण्याचं काम सुरु झालं. "आम्ही हिऱ्यांच्या शोधात आहोत. आम्हाला काही ब्रेसलेट आणि अंगठ्याही शोधायच्या आहेत," असं हॉल कौंटीचे सॉलिड वेस्ट डायरेक्टर जॉनी विकर्स यांनी जाहीर केलं.
महिलेने हे सर्व दागिने चुकून कचऱ्यासोबत फेकून दिले होते. हा कचरा आणि पर्यायी दागिने कँडलर रोड इथे असलेल्या लॅण्डफिल साईटपर्यंत पोहोचले. विकर्स म्हणाले की, "अशा प्रकरणांमध्ये वेळेचं महत्त्व अधिक आहे. आम्ही पाच कर्मचाऱ्यांचं एक पथक बनवलं असून कचऱ्यामधून दागिने शोधण्याचं काम त्यांना देण्यात आलं होतं."
"आम्ही हे दागिने स्वत:चे समजून शोधले," असंही विकर्स यांनी सांगितलं. दागिने काळ्या रंगांच्या बॅगमध्ये आहेत, हा एकमेव पुरावा त्यांच्याकडे होता. अखेर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि बॅग सापडली.
"बॅग पाहून सगळे आनंदाने ओरडू लागले. ही बॅग तिच होती, ज्यात हिऱ्याचे दागिने होते," असं विकर्स म्हणाले.