America Road Accidentन्यूयॉर्क: अमेरिकेतील न्यू ऑरिलीन्समध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नववर्षाचं स्वागत करणाऱ्यांच्या गर्दीत एक  चारचाकी वाहनं घुसलं. त्यानंतर चालकानं वाहनातून उतरत गोळीबार सुरु केला. यामध्ये जवळपास 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जखमींची संख्या 30  वर पोहोचला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार न्यू ऑरिलीन्समधील घटनेत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर काही लोक जखमी झाली आहेत.  


एपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार बुधवारी शहरातील प्रसिद्ध बॉर्बन रस्त्यावर एक वाहन लोकांमध्ये घुसलं, त्यानं लोकांना चिरडलं. या घटनेत पोलिसांकडून कारवाई सरु करण्यात आली आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.  


गर्दीत  वाहन घुसलं


घटनास्थळावरील साक्षीदारांच्या मते नववर्षाचं स्वागत करणाऱ्या लोकांच्या गर्दीत ट्रक घुसला त्यानंतर ड्रायव्हर वाहनातून बाहेर येऊन गोळीबार करु लागला. त्याला उत्तर देत पोलिसांनी देखील गोळीबार सुरु केला. न्यू ऑरिलीन्सच्या आपत्कालीन यंत्रणेनं अशी घटना होऊ शकते, असा इशारा दिला होता. लोकांनी या ठिकाणापासून दूर राहावं, असं सांगण्यात आलं होतं. 


सीबीएस न्यूजच्या हवाल्यानं पोलिसांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, सुरुवातीच्या रिपोर्टनुसार एका कारनं लोकांच्या गर्दीत टक्कर दिली. नेमके किती लोक जखमी झाले याबाबत माहिती नाही. मात्र, काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना नववर्षाच्या पहिल्या काही तासात झाली आहे. लोकप्रिय पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गर्दी असते.  


हा हल्लाच :गव्हर्नर जेफ लँड्री 


लुइसियानाचे गव्हर्नर जेफ लँड्री यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं की आज सकाळी बॉर्बन स्ट्रीटवर झालेली हिसांत्मक घटना भयानक आहे. लोकांनी या ठिकाणापासून दूर राहावं, जिथं हल्ला झाला आहे. स्थानिक प्रशासनानं हा हल्ला असल्याचं म्हटलं आहे.






इतर बातम्या :