Nanded : नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबारायाचे मनोज जरांगे पाटील यांनी आज दर्शन घेतले. यावेळी पूजाअर्चना करून पाटील यांनी खंडोबाचे दर्शन घेतले. गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होतोय. त्यांना आरक्षण मिळू दे, शेतकरी अडचणीत आहे त्यांना बळ मिळावं, सरकारने शेतकर्‍यांना मदत करावी, असा आशीर्वाद आपण खंडोबाकडे मागितल्याचे जरांगे पाटील म्हणाले. तसेच ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्या दिवशी आमचं खर नवीन वर्ष असे म्हणत मनोज जरांगेंकडून सरकारविरुद्ध परत एकदा संताप व्यक्त केला आहे. 


नवीन वर्ष आम्हाला आहे की नाही असं वाटतंय. सुख आमच्या वाट्याला नाही. आरक्षण नसल्यामुळे गरिबांच्या लेकराचं आयुष्य बरबाद होत आहे. नवीन वर्ष येतात जातात, पण आम्हाला न्याय कधी मिळेल याची अपेक्षा आहे. खरं नवीन वर्ष ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्या दिवशी असेल. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे काय म्हणाले?


देवेंद्र फडणवीस म्हणत होते मी कोणाला अडसर नाही. , एकनाथ शिंदे साहेबांना विचारा मी अडसर आहे का मराठा आरक्षणाबाबत . आता लक्षात येईल तेच आहेत मुख्यमंत्री , 25 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढतेत की नाही, ते स्पष्ट होईल. आमरण उपोषण 25 जानेवारीला फायनल आहे . सामूहिक सुध्दा होण्याची शक्यता आहे . कारण सगळेजण म्हणत आहेत आम्हाला पण उपोषणााला बसायचं आहे . ही शेवटची टक्कर द्यायची , अंतिम लढाई करुन आरक्षण मिळवायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.


राज्यात बहुमताच सरकार आहे  . तेव्हादेखील हेच होते ना . नुसते खांदे बदलले, नांगराचे बैल बदलल्यासारखे . पूर्वीही तेच होते आत्ता ही तेच आहेत . मराठ्यापुढे सरकार काही करत नाही. आमचं आंदोलन सरकार गांभीर्याने घेईल का नाही, हे आम्ही बघू आता . आतापर्यंत ढकलाढकली होती . आता मुख्यमंत्री फडणवीस आहेत . त्यांना 25 तारखेपर्यंत वेळ गेल्यावर तोपर्यंत काही बोलणार पण नाही, नंतर सोडणार नाही, असेही जरांगे यांनी सांगितले.


गृहमंत्रीदेवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगेंचा इशारा


गृहमंत्रालयावर समाधानी असण्याचं  कारण नाही . मस्साजोग आणि परभणीत जीव गेला . मस्साजोग प्रकरणात आणखी आरोपी फरार आहेत . न्याय मिळाला तरी समाधान नाही कारण एका आईचा मुलगा गेला . वाल्मिक कराडबाबत पोलीस योग्य तपास करतील . पोलीस सोडणार नाही कोणालाच . मुख्यमंत्र्याचा तसा शब्द आहे .


धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा का त्याबद्दल मला माहीत नाही . मला एवढच माहिती आहे , या प्रकरणात जे जे येतील, मग मंत्री असो , आमदार असो की राष्ट्रपती असो, सुट्टी द्यायची नाही, अन्यथा आम्ही महाराष्ट्र बंद पाडणार . आरोपींनी कोणा कोणाला फोन केले, आरोपींना कोणी पळवून लावले, कोणी आसरा दिला . त्यावेळेस  कोणी कोणाला सरकारी पाठबळ दिले, यामध्ये कोण मंत्री आहे का , आमदार आहे का , सरकारमधील मंत्री आहे . सगळे कॉल डिटेल्स घेऊन तपासणी करण्याचा तपास करावी . 


एखाद्याला न्याय देण्यासाठी , विरोधी पक्षातला असो का सत्ताधारी पक्षातला असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाधान उभे राहिला पाहिजे . संदीप क्षीरसागर, खासदार, सुरेश धस, येण्यासाठी बोलत आहेत . यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे . हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाही . मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्द पाळला नाही राज्य आम्ही बंद पडणार . 100% मराठे रस्त्यावर उतरणार, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.


आणखी वाचा


न्यायाधीशांच्या 'त्या' प्रश्नावर वाल्मिक कराड लगेच म्हणाला, 'मला पोलिसांकडून काही त्रास झाला नाही'