America Shot Down Chinese Spy Balloon : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या आकाशात दिसणाऱ्या चीनच्या स्पाय बलूनवर (China Spy Balloon) अमेरिकेने (America) मोठी कारवाई केली आहे. चीनचा स्पाय बलून अमेरिकेनं पाडला आहे. अमेरिकेने F-22 फायटर जेटने क्षेपणास्त्राचा मारा करत चीनचा स्पाय बलून फोडला आहे. यासोबतच अमेरिकेने चीनचा हेरगिरीचा डाव हाणून पाडला आहे. अमेरिकेच्या आकाशात दिसलेल्या स्पाय बलूनबाबत चीनने सांगितले होते की, याचा वापर हवामाना संबंधित माहिती गोळा करण्यासाठी करण्यात येईल.
लढाऊ विमानातून स्पाय बलूनवर क्षेपणास्त्राचा मारा
दरम्यान, अमेरिकेने चीनच्या स्पाय बलून पाडत चीनला मोठा झटका दिला आहे. जो बायडन प्रशासनाने कॅरोलिना किनार्याजवळ एक चीनचा स्पाय बलून पाडला आहे. F-22 लढाऊ विमानातून डागलेल्या क्षेपणास्त्राने हा फुगा फोडण्यात आला. अमेरिकेने एफ-22 फायटर जेट F-22 (F-22 Fighter Jet) मधून स्पाय बलूनवर क्षेपणास्त्राचा मारा केला. पेंटागॉनने दावा केला होता की, या बलूनद्वारे चीन हेरगिरी करत आहे. पेंटागॉन अमेरिकेच्या सैन्य दलाचे मुख्यालय आहे.
स्पाय बलूनवर होती अमेरिकेची करडी नजर
मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये आकाशात चीनचा स्पाय बलून उडताना दिसला. चिनी स्पाय बलून पहिल्यांदा अमेरिकेतील अणुऊर्जा प्रकल्पाच्या वर उडताना दिसला होता. यानंतर हा बलून लॅटिन अमेरिकेत दिसला. या बलूनवर अमेरिकेची करडी नजर होती. या बलूनद्वारे चीन हेरगिरी करत असल्याचा दावा पेंटागॉनने केला होता.
अमेरिकेने चीनचा स्पाय बलून पाडला
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने चिनी स्पाय बलून खाली पाडण्यात आल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केला आहे. अमेरिकन हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हा स्पाय बलून फोडला आहे. अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी दिलेल्या निवेदनानुसार, लढाऊ विमानातून क्षेपणास्त्राचा मारा करत दक्षिण कॅरोलिनाच्या किनार्याजवळ चीनचा स्पाय बलून खाली पाडला. याचे अवशेष हटवण्याचे काम सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :