मुंबई: कॅशव्हॅनमधून हजारो नोटा रस्त्यावर पडल्याचं चित्र अमेरिकेत पाहायला मिळालं.


अमेरिकेतील इंडियाना महामार्गावर एका कॅश मॅनेजमेंट कंपनीचा ट्रक जात होता. त्यावेळी अचानक ट्रकचा मागील दरवाजा उघडला आणि त्यातील हजारो डॉलर्स रस्त्यावर पडले.

ही गोष्ट लक्षात येताच, कर्मचाऱ्यांनी तातडीने पैसे जमा करण्यासाठी धाव घेतली.  मात्र तोपर्यंत रस्त्यावरील लोकांनी ही रक्कम गोळा करुन खिशात टाकले होते.

पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत मोठी रक्कम लंपास झाली होती. या घटनेत सुमारे 60 हजार डॉलर्स म्हणजेच 4 कोटी रुपये लंपास झाले आहेत, असं दावा अमेरिकेतील माध्यमांनी केला आहे.

पैसे लंपास करणाऱ्यांना पोलिसीं स्वत:हून  पैसे जमा करण्याचं अवाहन केलं. अन्यथा चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील असा दम दिला आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.