America Wave Clouds : निसर्गाची विविध अद्भुत करणारी दृष्य जगभरातील लोकांना आकर्षित करतात. काही दृश्य अशी असतात की डोळ्यांच्या नजरेत कैद करून ती आयुष्यभर लक्षात राहतात. अशी अद्भुत दृष्य अनेकदा आपल्याला आकाशातील ढगांच्या बाबतीत देखील पाहायला मिळतात. बर्याच वेळा ढगांमध्ये असा आकार तयार होतो, जो प्रत्येक माणसाला आपल्या डोळ्यांत कैद करावासा वाटतो. नुकतेच अमेरिकेच्या आकाशात असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले. इथे आकाशात ढगांचा हा अनोखा अंदाज कॅमेरात कैद झाला आहे.
अमेरिकेच्या आकाशात अतिशय अनोख्या पद्धतीने दिसणारे हे वेव्ह क्लाउड्स आकाशात जोरदार लाटा उसळल्यासारखे दिसत आहेत. या ढगांचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. प्रत्येकजण या चित्राच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसतोय.
अमेरिकेत आकाशातील ढगांचे अनोखं दृश्य
अमेरिकेतील वायोमिंग राज्यात हे अतिशय आकर्षक दृष्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. समुद्राच्या लाटांसारखे दिसणारे ढग लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. अनेकांनी हे खास विहंगम दृष्य कॅमेऱ्यात कैद केले. रॅचेल गॉर्डन या स्थानिक नागरिकाने सांगितले की, हे क्षण खूप खास होते आणि मला वाटले की अतिशय खास आकारात बनवलेल्या या ढगाचे छायाचित्र टिपले पाहिजे. अतिशय खास आणि सुंदर दृष्य असलेले हे ढग मंगळवारी शेरिडन शहरातील बिघॉर्न पर्वताच्या शिखरावर दिसले. ही घटना केल्विन-हेल्महोल्ट्झ म्हणून ओळखली जाते.
मूळ फोटो की पेंटिंग?
मीडियाशी बोलताना गॉर्डनने हा खूप खास क्षण असल्याचे सांगितले. असे म्हटले जाते की, ही विशेष छायाचित्रे केल्विन हेल्महोल्ट्झ ढगांचे सर्वात अद्वितीय आणि उत्कृष्ट उदाहरण आहेत. या ढगांना लॉर्ड केल्विन आणि हर्मन वॉन हेल्महोल्ट्ज या शास्त्रज्ञांच्या नावावरून नाव देण्यात आले आहे. त्यांनी या घटनेमागील विज्ञानाचा अभ्यास केला. रेचेल गॉर्डन याने त्याच्या घराच्या मागे या ढगांचे फोटो काढले, जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे खरं दृष्य आहे की चित्र आहे यावर लोकांचा क्षणभर विश्वास बसत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Facts About Traffic in India: ट्रकच्या मागे 'Horn OK Please' का लिहितात? जाणून घ्या त्यामागील कारण