Facts About Traffic in India : तुमच्यापैकी अनेकांनी रस्त्यावर धावणारा ट्रक आणि त्यावर लिहिलेली वाक्य पाहिली असतील. अनेकदा या ट्रकवरचा मजकूर चारोळ्यांच्या स्वरूपात असतो. तर कधी यावर गमतीशीर चित्र काढलेली असतात. मात्र, तुम्ही, सगळ्या ट्रकवर एक गोष्ट कायम लिहिलेली असते हे तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? ते वाक्य म्हणजे 'Horn OK Please'. तुम्हाला हे वाक्य मोठ्या ट्रॅक्टर ट्रॉली, लहान कॅंटर यांसारख्या अनेक वाहनांवर लिहिलेल्या दिसतील. पण, याचा अर्थ नेमका काय हे तुम्हाला माहित आहे का? हे का लिहिले जाते? चला तर मग याचा अर्थ नेमका काय ते जाणून घेऊयात. 


Facts About Traffic in India : या मजकूराच्या संदर्भात भिन्न मतं आहेत


अनेकांचं असं मत आहे की, तुम्ही कोणतेही वाहन चालवताना ओव्हरटेक करता तेव्हा तुम्ही हॉर्न वाजवलाच पाहिजे. यातून Horn Please हा संदेश तर ठळकपणे दिसतो. मात्र, या दोन शब्दांच्या मधला OK या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर, या OKचा कोणताही विशिष्ट अर्थ नसला तरी या OK मागे अनेक सिद्धांत आहेत. ज्यामध्ये OKचा अर्थ वेगवेगळा स्पष्ट करण्यात आला आहे. हे सिद्धांत कोणते ते पाहा. 


Facts About Traffic in India: पहिला सिद्धांत


हा सिद्धांत असे सांगतो की, ओव्हरटेक करण्यासाठी आधी तुम्ही ट्रक चालकाला हॉर्न देता, त्यानंतर ट्रकचालकाची बाजू पाहून, लाईट किंवा इंडिकेटर देऊन, तो तुम्हाला ओव्हरटेकसाठी बाजू देतो. या सिद्धांतानुसार, ही प्रक्रिया OK मानली जाते.


Facts About Traffic in India ; दुसरा सिद्धांत


ही संकल्पना बरीच जुनी आहे. कारण ट्रकच्या मागे OK लिहिण्याची सुरुवात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाली होती. वास्तविक तेव्हा रॉकेलवर ट्रक चालायचे. त्यामुळे त्यांच्यावर 'केरोसीनवर' म्हणजेच ‘On Kerosene’ असे लिहिले जायचे.


Facts About Traffic in India : तिसरा सिद्धांत


या सिद्धांतानुसार असे सांगितले आहे की, पूर्वी 'Horn OTK Please' असे लिहिले गेले होते आणि त्याचा अर्थ असा होता की ओव्हरटेक करण्यापूर्वी हॉर्न वाजविला ​​पाहिजे. कालांतराने OKT मधून T हटविण्यात आला. तेव्हापासून ते फक्त OK असे लिहिले आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


OK Full Form : बोलण्यात प्रत्येक वेळी वापरला जाणारा शब्द म्हणजे 'OK'; पण या शब्दाचा Full Form तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आत्ताच वाचा