अल्जेरियात विमान कोसळलं, 257 सैनिकांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 11 Apr 2018 03:07 PM (IST)
अल्जेरियन मिलिट्री विमान क्रॅश होऊन जवळपास 257 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हे विमान अल्जेरियातील बेछार या शहराकडे जात होतं.
अल्जेरियर्स (अल्जेरिया): अल्जेरियन मिलिट्री विमान क्रॅश होऊन जवळपास 257 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं. तर मृतांचा आकडा वाढल्याचं वृत्त 'रॉयटर्स'ने दिलं आहे. हे विमान अल्जेरियातील बेछार या शहराकडे जात होतं. स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अल्जेरियातील बोऊफरिक विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली. Il-76 हे विमान शेकडो सैनिकांना घेऊन जात होतं. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर अल्जेरियात एकच खळबळ उडाली. सध्या प्रशासनाने तातडीचं मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे. 14 अँम्ब्युलन्स आणि 10 ट्रकद्वारे जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. दरम्यान, सोशल मीडियात या अपघातासंबंधी एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. या व्हिडीओत दुर्घनाग्रस्त विमानातून धूर येताना दिसत असून, आजूबाजूला मदत आणि बचावकार्य सुरु असल्याचं दिसतं.