माजुरो : न्यूझीलंडमध्ये एका प्रवासी विमानाला विचित्र अपघात झाला आहे. न्यूझीलंडच्या सुदुर प्रशांत द्विपवर एक प्रवासी विमान लॅन्ड होताना तलावात पडलं आहे. विमान लॅन्ड होतांना रनवेच्या पुढे असलेल्या तलावात गेल्याने हा अपघाता झाला.


विमान तलावात पडल्याने पाण्यात बुडू लागलं होतं. त्यावेळी प्रवाशांना पोहत विमानाबाहेर येऊन आपला जीव वाचवावा लागला. एअर न्यूगिनी रिपीट न्यूगिनीचं हे बोईंग 737-800 विमान मायक्रोनेशियामध्ये वेनो विमानतळावर लॅन्डिग होत होतं. मात्र नियंत्रण सुटल्याने ते रनवेच्या पुढे निघून गेलं आणि थेट तलावात अर्ध बुडलं. शुक्रवारी ही घटना घडली आहे.


विमान तलावात बुडताना पाहून तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी छोट्या बोटींच्या साहाय्याने प्रवाशांना विमानातून सुखरूप काढण्यास सुरूवात केली. स्थानिक नागरिकांना एकूण 35 प्रवाशांना आणि 12 क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढलं. या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचं विमान कंपनीने स्पष्ट केलं आहे.



एअर न्यूगिनी रिपीट न्यूगिनी, पापूआ न्यू गिनीची राष्ट्रीय विमान सेवा आहे. पापुआ न्यू गिनी दुर्घटनेच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीने स्पष्ट केलं की, तपास अधिकाऱ्यांना आम्ही वेनो पाठवण्यासाठी तयारी करत आहेत.