SpaceX Mission : टेल बिलिनियर इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीची पहिली अंतराळ सफर 'इन्स्पिरेशन 4' (Inspiration4) यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. चार सामान्य लोकांना घेऊन स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टने तीन दिवस अंतराळात पृथ्वीच्या फेऱ्या मारल्या. आज पहाटे फ्लोरिडाच्या तटावर याचे यशस्वी लॅन्डिंग करण्यात आलं आहे. सामान्य लोकांना घेऊन अंतराळात जाणारे हे पहिलंच मिशन होतं.
भारतीय प्रमाणवेळेनुसार, गुरुवारी (15 सप्टेंबर) पहाटे पाच वाजून 33 मिनिटांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील कॅनेडी स्पेस सेंटरमधून चार सामान्य नागरिकांना घेऊन स्पेसएक्सचं क्रू ड्रॅगन कॅप्सूल फाल्कन-9 रॉकेटमधून अंतराळ प्रवासासाठी रवाना झालं होतं. इतिहासात पहिल्यांदाच हे अवकाशयान केवळ सामान्य नागरिकांसह पृथ्वीच्या कक्षेत लॉन्च करण्यात आलं होतं.
2009 नंतर पहिल्यांदाच घडला इतिहास
हे अंतराळवीर 357 मैल म्हणजेच, सुमारे 575 किलोमीटर उंचीवर गेलं होतं. 2009 नंतर पहिल्यांदाच मानव इतक्या उंचीवर जात आहे. मे 2009 मध्ये शास्त्रज्ञांनी 541 किमी उंचीवर जाऊन हबल दुर्बिणीची दुरुस्ती केली होती. अशातच स्पेस एक्सच्या या मोहिमेचा मूळ हेतू अमेरिकेतील सेंट जुडे चिल्ड्रन्स रिसर्च रुग्णालयासाठी निधी गोळा करणं आहे. तसेच कर्करोगाविषयी लोकांना जागरूक करणे हे या मिशनचे ध्येय आहे.
अंतराळात गेलेल्या व्यक्तींपैकी सर्वजण सामान्य नागरिक
अंतराळात ज्या चार व्यक्तींना पाठवलं होतं त्यांच्यापैकी एकही व्यक्ती प्रोफेशनल नव्हती. या सर्व व्यक्ती सामान्य व्यक्ती आहेत. या व्यक्तींना केवळ पाच महिन्यांचं ट्रेनिंग देण्यात आली होतं.
संबंधित बातम्या :
- Elon Musk's SpaceX Inspiration 4 : अंतराळ पर्यटनाचा 'श्रीगणेशा'; स्पेसएक्सची सर्वसामान्य नागरिकांसह अंतराळात भरारी
- Elon Musk House : इलॉन मस्क यांचं 'इन्स्टन्ट घर' पाहिलंय का? छोट्याशा बॉक्समध्ये राहतोय अब्जाधीश!
- Pooja Batra Photos: पूजा बत्रा इलॉन मस्कची आई मये मस्कसोबत दिसली, फोटो सोशल मीडियावर व्हायरल