न्यूयॉर्क: अमेरिकेत अॅबॉट लॅबोरेटरीने बुधवारी जाहीर केले की त्यांना अमेरिकेत कोविड 19 पोर्टेबल अँटिजेन टेस्टसाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे. या टेस्टचा रिझल्ट केवळ पंधरा मिनिटात समजेल आणि त्यासाठी 5 डॉलर इतका खर्च येणार आहे.
ही पोर्टेबल चाचणी क्रेडिट कार्डच्या आकाराइतकी आहे आणि तिची हाताळणी करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त साधनांची आवश्यकता नाही. तसेच ती पारंपरिक लॅब टेस्टपेक्षा कमी तिव्रतेच्या स्वॅबचा वापर करून घेतली जाईल असे अॅबॉट लॅबोरेटरीच्या अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या सप्टेंबरमध्ये दहा दशलक्ष चाचण्या घेण्यात येतील तर ऑक्टोबरच्या सुरवातीपासून ती संख्या 50 दशलक्ष वर नेण्याचा अॅबॉट लॅबोरेटरीचा मानस आहे.
बिनॅक्स नाऊ कोविड 19 एजी कार्ड या टेस्टचा वापर शाळा किंवा कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परत येणारे लोक, जे अमेरिकेला पूर्वपदावर आणण्यास मदत करत आहेत त्यांच्यासाठी केला जावू शकतो असंही त्या अधिकाऱ्याने सांगितले.
अॅबॉटने यासंबंधी एक असे अॅप तयार केले आहे ज्याद्वारे लोक कोणत्याही ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी आपण कोविड मुक्त असल्याचे दाखवू शकतील.
अँटिजेन टेस्ट ही तुलनेनं अधिक जलद आणि स्वस्त असते पण कोविडच्या केसमध्ये लॅब आधारित डायग्नोस्टिक टेस्टच्या तुलनेत ती कमी अचूक असते.
तंबाखूच्या पानांपासून कोविड प्रतिबंधक लस!, थायलंडच्या डॉक्टरांचं संशोधन
या चाचणीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानं त्यांच्या आणिबाणी वापर मान्यता कार्यक्रमाअंतर्गत अधिकृत मान्यता दिली आहे. बेक्टॉन डिकिन्सन अँड कंपनी आणि क्विडेल कॉर्प या कंपन्यांनी याआधीच त्यांच्या अँटिजेन टेस्ट बाजारात आणल्या आहेत.
सध्या अमेरिकेत इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 50 लाखांहून अधिक कोरोनाच्या रूग्नांची संख्या आहे आणि मागणीच्या तुलनेत हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांची संख्या अपूरी पडत आहे.
मार्चपासून या कंपनीला पाच इतर कोरोना व्हायरसच्या टेस्टसाठी अमेरिकेचीअधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यात आयडी नाऊ या काही मिनीटातच रिझल्ट देणाऱ्या टेस्टचा समावेश आहे. ही टेस्ट व्हाईट हाउसमध्ये वापरली जाते.
Rajesh Tope PC | श्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात : आरोग्यमंत्री राजेश टोपे