लंडन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम प्रकरणात भारताला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. ब्रिटीश सरकारने दाऊद इब्राहिमची लंडनमधील अब्जावधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
1993 मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचं कळतं.
लंडनमधील दाऊदची संपत्ती
- लंडनच्या हर्बर्ट रोडवर दाऊदने 35 कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली होती.
- स्पिटल स्ट्रीटवर दाऊदचं 45 खोल्यांचं आलिशान हॉटेल आहे.
- रोहॅम्पटनमध्ये दाऊद इब्राहिमची कमर्शिअल बिल्डिंग आहे.
- लंडनच्याच जॉन्सवूड रोडवर दाऊदचं मोठं घर आहे.
- याशिवाय शेफडर्स बुश, रोमफोर्ड क्रोयदोमध्ये हॉटेल आणि संपत्ती आहे.
21 नावं बदलून संपत्तीची खरेदी
मागील महिन्यातच ब्रिटीश सरकारने आर्थिक निर्बंधाबाबतच्या यादीत दाऊदचाही समावेश केला होता. या यादीत दाऊदची तीन ठिकाणं आणि 21 उपनामांचा उल्लेख केला आहे. म्हणजेच दाऊदने 21 नावं बदलून संपत्ती खरेदी केली होती.
पाकिस्तानात दाऊदचे तीन पत्ते
युनायटेड किंग्डमने जारी केलेल्या असेट्स फ्रीज लिस्टमध्ये दाऊदच्या पाकिस्तानातील 3 ठिकाणांचा उल्लेख आहे. या यादीनुसार, 'कासकर दाऊद इब्राहिम'चे पाकिस्तानातील तीन पत्ते असे आहेत...
- हाऊस नं. 37, गली नंबर 30, डिफेन्स हौसिंग अथॉरिटी, कराची, पाकिस्तान
- नूराबाद, कराची, पाकिस्तान
- व्हाईट हाउस, सौदी मस्जिदजवळ क्लिफ्टन, कराची
दाऊदची संपत्ती किती?
फोर्ब्स मॅगझिननुसार मोस्ट वॉण्टेड गँगस्टरपैकी एक असलेल्या दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर आहे. दाऊद हा जगभरातील दुसरा सर्वाधिक श्रीमंत गँगस्टर आहे.
याआधी यूएई सरकारचीही कारवाई
याआधी यूएई सरकारनेही दाऊद इब्राहिची 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर यूएई सरकारने हे पाऊल उचललं होतं.