न्यूयॉर्क : अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनामध्ये भारतीय वंशाचे नागरिक आकाश तलाटी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तलाटी एका मॉटेलचे मालक होते. या घटनेनंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आकाशच्या कुटुंबियांशी चर्चा करुन, त्यांचं सांत्वन केलं.
आकाश तलाटी मुळचे गुजरातचे रहिवासी असून, भारतात शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते अमेरिकेत गेले. या घटनेनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन, आकाशच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत दिली जाईल असं सांगितलं.
ज्या व्यक्तीने आकाशवर गोळ्या झाडल्या, त्या व्यक्तीला क्लबमधून बाहेर काढण्यात आलं होतं. यानंतर त्याने क्लबच्या सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घातली. अन् अंदाधुंद गोळीबार केला. त्यातील एक गोळी आकाशला लागली, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या नंतर सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत हल्लेखोर जखमी झाला. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेतील उत्तर कॉरोलिनामध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Nov 2017 07:54 AM (IST)
अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनामध्ये भारतीय वंशाचे नागरिक आकाश तलाटी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तलाटी एका मॉटेलचे मालक होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -