मनीला (फिलिपाईन्स) : गोल्फ खेळताना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे खाली कोसळल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच आशिया खंडाच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याबरोबर गोल्फ खेळत असताना ही घटना घडली.

गोल्फच्या मैदानातून बाहेर रेतीच्या ठिकाणी शिंजो आबे पडत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. याठिकाणी असणाऱ्या उतारावरुन ते घरंगळत खाली आले. त्यांच्या डोक्यावर असणारी टोपीही यावेळी पडली. त्यानंतर लगेच स्वतःच उठून ते पुन्हा मैदानात परतले.

दरम्यान, व्हिडीओमधील आणखी एक गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेते, ती म्हणजे शिंजो आबे पडले तेव्हा ट्रम्प यांचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. आबे पडल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही.

VIDEO :