बोगोता : कोलंबियातील मेडेलिन जवळच्या समुद्रात रविवारी सात मजली बोटीला 4 मिनिटात जलसमाधी मिळाली आहे. यावेळी बोटीवर जवळपास 150 पर्यटक प्रवास करत होते. यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण अजूनही बेपत्ता आहेत.


अल-अल्मीरांते नावाचं हे बोट मेडेलिनपासून 45 किलोमीटर आत समुद्रात बुडालं. या बोटीतील 21 जण गंभीर जखमी असून, 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून बचावाचं कार्य करण्यात येत होतं.

रविवारी हे जहाज बुडत असताना, छोट्या बोटीने समुद्रात फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांनी बोटीकडे धाव घेऊन, प्रवाशांना वाचवण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेतील एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की, बोट समुद्रात बुडत असताना, एकच गोंधळ सुरु होता. यात बोटीच्या वरच्या मजल्यावरील प्रवाशांनी तत्काळ समुद्रात उडी मारुन 40 जणांनी स्वत:चा जीव वाचवला. तर 99 जणांना वाचवण्यात यश आलं. पण 9 जणांचा मृत्यू झाल असून, 28 जण गंभीर जखमी झालेत.

व्हिडीओ पाहा