लंडन:  भारतीय लोकांमध्ये आजही शिक्षकी पेशाचे आकर्षण कायम आहे. एकीकडे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत असताना भारतीय लोकं मात्र शिक्षकच व्हायचंय अशा भूमिकेत आहेत. आजही भारतातीलल 50 टक्क्यांहून अधिक पालक आपल्या मुलांसाठी शिक्षकी पेशालाच पसंती देत असल्याची बाब इंग्लंडच्या वर्कली फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाली आहे. शिक्षकी पेशाकडे जगभरात आकर्षणही कमी होत चाललं आहे. जगामध्ये गेले काही वर्ष प्राध्यापकांचा स्तर घसरतो आहे. याचा अभ्यास करण्यासाठी जगातील 35 देशांमध्ये वर्कली  फाउंडेशनने सर्व्हेक्षण केले आहे. भारतामध्ये तब्बल 54 टक्के लोकांनी शिक्षकी पेशाला पहिली पसंती दिली आहे. ब्रिटन सारख्या देशामध्ये फक्त 23 टक्के लोकांनी प्राध्यापक होण्यास पसंती दिली आहे तर चीनमध्ये 50 टक्के लोकांनी प्राध्यापक होण्यास पसंती दिली आहे. भारतात 16-64 या वयोगटातील विद्यार्थी आणि 5500 प्राध्यापकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. 77 टक्के भारतीयांच्या मते आजही विद्यार्थी त्यांच्या प्राध्यापकांचा आदर करतात. युरोपातील देशांमध्ये मात्र प्राध्यापक होण्यास कमी पसंती दिली जाते.