Colombia Prison : कोलंबियाच्या कारागृहात दंगल घडवण्याच्या प्रयत्नात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करताना 49 कैदी ठार झाले झाले आहेत. तर 40 पेक्षा अधिक कैदी जखमी झाले आहेत.  मंगळवारी पहाटे ही धक्कादायक घटना घडली आहे. 


एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल प्रिझन्स एजन्सीच्या अधिकाऱ्याने या घटनेबाबतची माहिती दिली आहे. नॅशनल पेनिटेंशरी अँड प्रिझन इन्स्टिट्यूटच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आतापर्यंत 49 लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 


"कॅराकोल रेडिओने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, आग लागल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. या घटनेत  40 हून अधिक कैदी जखमी झाले आहेत.


या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान ही घटना घडली. कॅराकोल रेडिओच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. या घटनेत 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


कोलंबियाच्या कारागृहात क्षमता  जास्त कैद्यांना ठेवण्यात आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, कोलंबियन तुरुंगात 81,000 लोकांची क्षमता आहे, परंतु तेथे सुमारे 97,000 केद्यांना ठेवण्यात आले आहे. कोलंबोचे राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी या घटनेची चौकशी केली जाईल असे ट्विट केले आहे. ते म्हणाले, "तुलुआ, व्हॅले डेल येथील तुरुंगात घडलेल्या घटनेबद्दल आम्हाला अतीशय दु:ख झाले आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असे ट्विट ईव्हान ड्यूक यांनी केले आहे.  


लॅटिन अमेरिकेतील तुरुंगांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना  
लॅटिन अमेरिकेतील अनेक तुरुंगांमध्ये नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवले जाते. शिवाय कारागृहात वारंवार प्राणघातक हल्ले देखील होत असतात. गेल्या वर्षभरात शेजारच्या इक्वाडोरमधील तुरुंगात शेकडो लोक मरण पावले आहेत.