लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये ग्रेनफेल टॉवर या इमारतीला भीषण आग लागली आहे. पश्चिम लंडनमधील इमारतीत ही आग लागली आहे. या आगीत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर जखमींचीही संख्या मोठी आहे.


https://twitter.com/ANI_news/status/874824105127587841

पश्चिम लंडनमधील या इमारतीला स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी आग लागली. यात संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. त्यामुळे आगीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचा आकडा मोठा असण्याची भीती व्यक्त होत आहे. अग्नीशमन दलाचे जवान संपूर्ण इमारतीमध्ये शोध घेत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा नेमका किती हे स्पष्ट झालं नाही.

https://twitter.com/ANI_news/status/874822288490639360

अग्निशमन दलाचे 200 जवान 40 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळालं असलं तरीही शेवटची माहिती हाती आली तेव्हा आग इमारतीमधील आग धुमसतच होती आणि धुराचे लोटही बाहेर पडत होते.

ही आग एवढी भीषण आहे की आगीमुळे इमारत एका बाजूला कलल्याची माहिती आहे. या इमारतीमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरेशी साधनसामग्री बसवण्यात आली नसल्याची माहितीही समोर आली आहे.