मुंबई : नवीन वर्षाचा पहिला दिवस हा चार लाख बाळांचा पृथ्वीतलावरील पहिला दिवस होता. एक जानेवारीला जगभरात जवळपास चार लाख बाळांचा जन्म झाला असून त्यापैकी 70 हजार अर्भकं भारतात जन्माला आली आहेत.
युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेने ही आकडेवारी जारी केली आहे. जगभरात जन्माला आलेल्या लेकरांपैकी 25 टक्के एकट्या आशिया खंडात जन्माला आली आहेत. तर 69 हजार 944 म्हणजेच 18 टक्के बाळं भारतात जन्मली.
1 जानेवारी 2019 रोजी जन्मलेल्या बाळांची आकडेवारी
जगात - तीन लाख 95 हजार 72
भारत - 69 हजार 944
चीन - 44 हजार 940
नायजेरिया - 25 हजार 685
पाकिस्तान- 15 हजार 112
इंडोनेशिया - 13 हजार 256
यूएस - 11 हजार 86
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो - 10 हजार 53
बांगलादेश - 8 हजार 248
जन्मानंतर बाळांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना योग्य सुविधा मिळणं तितकंच गरजेचं आहे. 2017 साली जवळपास दहा लाख बाळांचा जन्म पहिल्याच दिवशी झाला होता, तर 25 लाख बाळांचा पहिल्याच महिन्यात मृत्यू झाला होता.
बालमृत्यूची प्रमुख कारणं काय?
-गर्भारपणातील समस्या
-न्यूमोनियासारखा संसर्ग
गेल्या 30 वर्षात बाल मृत्यूदचं प्रमाण कमी झालं आहे. तरी हा दर आणखी कमी करण्यावर युनिसेफचा भर असेलं असं उप कार्यकारी संचालक चार्लोट पेट्री गॉरनित्झ्का यांनी सांगितलं. 2019 च्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या या चार लाख बाळांना दीर्घायुष्य लाभावं, हीच सदिच्छा.
1 जानेवारी 2019 ला जगात 4 लाख बाळांचा जन्म, भारतात...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jan 2019 04:24 PM (IST)
युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेने ही आकडेवारी जारी केली आहे. जगभरात जन्माला आलेल्या लेकरांपैकी 25 टक्के एकट्या आशिया खंडात, तर 69 हजार 944 म्हणजेच 18 टक्के बाळं भारतात जन्मली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -