नवी दिल्ली: पाकिस्तानच्या नॅशनल डेटाबेस रजिस्ट्रेशन अथॉरिटी (एनएडीआरए)ने एका 35 वर्षीय तरुणाला 116 वर्षांचा वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. जिओ न्यूजने बुधवारी यासंदर्भात बातमी दिली असून नासीर अहमद असे या तरुणाचे नाव आहे.
एनएडीआरएने नासीर अहमदचे वय त्याचे वडील आणि आजोबांपेक्षाही जास्त असल्याचे नमुद केले आहे. एनएडीआरएने नासीरचा जन्म 1900 साली झाल्याचे नमुद केले आहे. तर त्यांच्या वडिलांचा जन्म 1960 साली झाला.
या चुकीमुळे नासीर अहमदला अनेक अडचणीेंचा सामना करावा लागत आहे. एनएडीआरएच्या या भोंगळ कारभारामुळे त्याला कोणत्याही सरकारी कार्यालयात नोकरीसाठी अर्ज करणे आवघड झाले आहे.