आधी आईवरुन शिवी, नंतर ओबामांची माफी!
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2016 10:22 AM (IST)
मलीना : जगातील सर्वात शक्तिशाली देश अर्थात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शिवी दिल्यानतर फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांनी माफी मागितली आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, रॉड्रिगो यांनी त्यांच्या विधानावर खेद व्यक्त केला आहे. https://twitter.com/ANI_news/status/773015229286449152 मानवाधिकाराचं उल्लंघनाच्या मुद्द्यावरुन रॉड्रिगो डुटर्टे यांनी बराक ओबामांना आईवरुन शिवी दिली होती. यानंतर ओबामांनी रॉड्रिगो डुटर्टे यांच्यासोबतची लाओसमध्ये आज होणारी प्रस्तावित भेट रद्द केली होती. काय आहे प्रकरण? रॉड्रिगो डुटर्टे यांनी बराक ओबामा यांना आईवरुन शिवी दिली. फक्त शिवीच नाही तर डुटर्टे यांनी ओबामांना खुलेआम धमकीही दिली. "ओबामा स्वत:ला काय समजतात. मी एका स्वतंत्र देशाचा राष्ट्रपती आहे. माझी मालक केवळ फिलिपिन्सची जनता आहे. आम्हाला एकमेकांचा आदर करायला हवा. मी अमेरिकेच्या हातचं बाहुलं नसून जशास तसं उत्तर द्यायला तयार आहे," असं विधानही त्यांनी केलं.