साओ पाउलो : नेहमी व्यायाम आणि फिटनेसकडे लक्ष देणारा 33 वर्षीय ब्राझीलचा बॉडीबिल्डर डॉस सॅंटोस याचा कार्डियक अरेस्टने (Cardiac Arrest ) मृत्यू झाला आहे. सॅंटोस इंस्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय होता. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो त्याच्या जिम वर्कआउटचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करायचा. सीएनएन ब्राझीलने आपल्या रिपोर्टमध्ये या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
वृत्तानुसार, डॉस सँटोसची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्याला साओ पाउलो येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी (19 नोव्हेंबर) उपचारादरम्यान त्याची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. डॉस सँटोस हा व्यवसायाने डॉक्टर होता. मात्र, त्याला बॉडीबिल्डिंगची खूप आवड होती. त्याच्या मृत्यूबद्दल त्याच्या क्लिनिकने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की डॉस सँटोस यांच्या यकृतामध्ये एडेनोमा (एक प्रकारचा सौम्य ट्यूमर) होता ज्यामुळे रक्तस्त्राव झाल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला.
स्टेरॉईडमुळे मृत्यू नाही
क्लिनिकने जारी केलेल्या निवदेनात, सँटोसचा मृत्यू अॅनाबॉलिक स्टेरॉइड्सच्या वापरामुळे झाला नसल्याचे म्हटले आहे. डॉस सॅंटोस नियमितपणे त्याच्या फॉलोअर्सना त्याच्या फिटनेस, फॅशन आणि ट्रिपबाबत इंस्टाग्रामवर अपडेट देत असे. इंस्टाग्रामवर त्याचे 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अलीकडेच त्याने कॅरोलिन सांचेझशी साखरपुडा होते. ही देखील बॉडीबिल्डर आहे.
नुकताच झाला होता साखरपुडा
डॉ. सॅंटोसने साओ पाउलोच्या दक्षिणेस मोएमा येथील अब्बास दुआर्टे क्लिनिकमध्ये काम करत होते. त्याची नियोजित कॅरोलिन सांचेझनेही येथे काम केले. त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या ट्यूमरवर उपचार सुरू होते की नाही याची पुष्टी वृत्तात झाला नाही.