26/11 ला 9 वर्षे पूर्ण, हल्ल्याचा मास्टरमाईंड अजूनही मोकाट
एबीपी माझा वेब टीम | 26 Nov 2017 12:48 PM (IST)
शेकडो जणांचा जीव घेणाऱ्या या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद अजून मोकाट फिरतोय.
नवी दिल्ली : मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला आज 9 वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. शेकडो जणांचा जीव घेणाऱ्या या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद अजून मोकाट फिरतोय. नदरकैदेत ठेवलेल्या हाफिज सईदला पाकिस्तानने 26/11 हल्ल्या नऊ वर्षे पूर्ण होण्याच्या मुहूर्तावर सोडलं आहे. 26/11 हल्ल्याच्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. हाफिज सईदला पाकचा पाठिंबा कशामुळे? पाकिस्तानने नेमकं 26/11 हल्ल्याच्या नऊ वर्षपूर्तिनिमित्त मोकाट सोडलं आहे. भारताच्या ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत काश्मीर घाटीत दहशतवाद्यांचा सुपडासाफ केला जातोय. यावर्षात जवळपास 200 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. दहशतवादी सध्या अंडरग्राऊंड होत आहेत. दहशतवाद्यांची फौज कमी होताना दिसत असल्याने पाकिस्तानने हाफिज सईदला सोडलं आहे. भारताला अमेरिकेची साथ हाफिज सईदची सुटका केल्यामुळे भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. दहशतवादाविरोधात अमेरिकेनेही भारताला साथ देत पाकिस्तानला खडसावलं. जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला तातडीने अटक करा, अशा शब्दात अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावलं. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयीन समीक्षा बोर्डाने हाफिजची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित बातम्या :