राम लीलातील ‘नगाडा’ गाण्यावर मानुषीनं ठेका धरला.पारंपरिक भारतीय पोशाखातील मानुषीनं सर्वांचीच मनं जिंकली.
मिस वर्ल्डचं ऑफिशियल चॅनेलने यूट्यूबवर मानुषीच्या डान्सचा व्हीडीओ पोस्ट केला आहे. मानुषीच्या डान्सचा हा व्हिडीओ केवळ तीन दिवसात 1.2 मिलियनपेक्षा जणांनी पाहिला आहे.
मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यापासून सोशल मीडियात तिची जोरदार चर्चा सुरु आहे. तिने मिस वर्ल्डचा खिताब पटकावल्यानंतर, काँग्रेस नेते शशी थरुर यांनी एक ट्वीट केला होता. पण हे ट्वीट थरुर यांच्या चांगलंच अंगलट आलं.
या ट्वीटनंतर नेटीझन्सनी थरुर यांचा चांगलाच समाचार घेतला.
व्हिडीओ पाहा