चीन: सध्या चीनमध्ये आकाशाला गवसणी घालण्याची जणू स्पर्धाच सुरु आहे. आकाशातील ढगांशी स्पर्धा करणारी तिथली रेल्वे, पुल आणि शहरात उभी असलेली गगनचुंबी इमारती, हे पाहून अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटते. पण याला जेव्हा हादरे बसतात, तेव्हा हे सर्व पत्त्याच्या बंगल्यासारखे जमीनदोस्त होते. गेल्या शनिवारी चीनच्या हॅकाऊमधून अशीच एक घटना समोर आली आहे. शहरातील 19 इमराती 10 सेकंदात पत्त्याच्या बंगल्यासारख्या जमीनदोस्त करण्यात आल्या.

वास्तविक, हकाऊमधील जुन्या इमारत पाडून तिथे नवी इमारती उभ्या करायच्या होत्या. यासाठी मोठ्या प्रमाणात विस्फोटक वापरण्यात आले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या, त्या 11 ते 12 मजली होत्या. या सर्व इमारती जमीनदोस्त करण्यामुळे जवळपास 15 हेक्टर क्षेत्र रिकामे झाले. इमारती जमीनदोस्त करण्यासाठी तब्बल 5 टन विस्फोटकांचा वापर करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

जेव्हा हे विस्फोटक 20 हजार ठिकाणी लावून उडवून देण्यात आले, तेव्हा 10 सेकंदात परिसरातील जुन्या इमारती 10 सेकंदात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्या. चीनमधील स्थानिक वृत्तपत्र हुबेई डेलीने दिलेल्या माहितीनुसार, याच परिसरात गेल्या काही दिवसात इमारती जमीनदोस्त करण्याची ही तिसरी घटना होती.

व्हिडीओ पाहा