मुंबई : मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने लंडनमधल्या एका मराठी तरुणाने एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओतून 13 देशातील 13 भाषिक तरुण-तरुणींकडून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


मुंबईचा असित कुलकर्णी हा तरुण सध्या लंडनमध्ये राहतो. असित पूर्वी रुईया महाविद्यालयात शिकत होता. आता इस्ट लंडन युनिव्हर्सिटीत फिल्म मेकिंग या विषयात असित पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. मराठी भाषा दिनानिमित्त असितने त्याच्या 13 देशातील मित्रांकडून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा मराठीत चित्रित करुन घेतल्या.

व्हिडिओमध्ये काय?

13 देशातील 13 भाषिक तरुणांनी मराठी भाषेत आपलं नाव सांगितलं आहे. त्यानंतर मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. नायजेरिया, इराण, फिलीपाईन्स, स्पेन, यूके, पाकिस्तान, स्लोवेकिया, भारत, नायजेरिया, माल्ता, रोमानिया, केनिया, ग्रीस या देशातील तरुणांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

इंडियन स्टोरीटेलर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडिओच्या सुरुवातीला त्याने इंग्रजी भाषेत मराठी भाषेची महती आणि मराठी भाषा दिवस साजरा करण्याचं कारण लिहिलं आहे. कुसुमाग्रजांच्या फोटोसह त्यांची माहितीही थोडक्यात दिली आहे.

पाहा व्हिडिओ :