अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटीने अवैध व्हिजा रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी डेट्रॉईड फार्मिंगटन हिल्स या विद्यापीठाच्या माध्यमातून एक गुप्त ऑपरेशन सुरु केले होते. या ऑपरेशनच्या माध्यमातून 'पे अँड स्टे' रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला. हे रॅकेट एक भारतीय ग्रुप चालवत होता.
या रॅकेटमध्ये जवळपास 600 विद्यार्थी अडकले आहेत. भारतीय दुतावासाने यात अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि पालकांना cons3.washington@mea.gov.in. यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.
अमेरिकेत राहायला मिळावे यासाठी बनावट विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या 130 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून त्यात बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना सदर विद्यापीठ हे बेकायदा आहे याची कुठलीही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी अजाणतेपणातून हे कृत्य केले आहे, असे असताना अधिकारी त्रासदायक पद्धतींचा वापर त्यांच्या विरोधात करीत आहेत, असे या मुलांच्या वकिलांनी म्हटले आहे.