Cervical Cancer : बदलत्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या वाढत्या ताणामुळे सध्या मानसिक आजाराचं प्रमाण फार वाढलं आहे. एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, मानसिक आजार, न्यूरोसायकियाट्रिक अपंगत्व आणि सिगारेट, दारू तसेच इतर नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन यामुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा (कॅन्सर) धोका दुप्पट पटींनी वाढला आहे.


गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे. जगभरात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने महिलांचा मृत्यू होतो. अशा वेळी स्मीअर चाचणी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग शोधण्याचा एक चांगला मार्ग आहे. ही चाचणी केल्याने तुम्हाला कॅन्सर झाला आहे की नाही ते सहज कळतं. मात्र, अनेक स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात. 


द लॅन्सेट पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, 1940 ते 1995 दरम्यान जन्मलेल्या 4 कोटींहून अधिक महिलांचा या संशोधनात समावेश करण्यात आला होता. संशोधकांनी मानसिक आजार, न्यूरोसायकियाट्रिक अपंगत्व आणि ज्यांची चाचणी झाली नाही अशा पदार्थांचा वापर, नियमितपणे चाचणी घेतलेल्या स्त्रियांशी तुलना केली. या संशोधनात, ज्या महिला अमली पदार्थांचं सेवन करतात त्यांच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.


ड्रग्स घेणाऱ्या महिलांना धोका!


कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या या संशोधनात असं आढळून आलं आहे की, ज्या महिला अमली पदार्थ, दारू, सिगारेट, ड्रग्स यांचं नियमित सेवन करतात. अशा महिलांमध्ये Cervical Cancer चा धोका वेगाने वाढतोय. अधिकतर महिला या ड्रग्सचं सेवन केल्याने या आजाराच्या बळी ठरल्या आहेत असंही दिसून आलंं आहे. त्यामुळे महिलांनी जर या पदार्थांचं मर्यादित सेवन केलं तसेच मानसिक तणाव घेतला नाही तर कदाचित त्यांचा हा आजार होण्यापासून बचावही होऊ शकतो.   


महिलांनी नियमित टेस्ट करणं गरजेचं 


कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेतील औषध विभागातील वरिष्ठ संशोधक म्हणतात, महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक महिलांनी नियमित टेस्ट करणं गरजेचं आहे कारण यामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होईल. 


गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे



  • मासिक पाळी दरम्यान जोरदार रक्तस्त्राव

  • पोटदुखी

  • रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव

  • योनीतून स्त्राव

  • लघवी करताना अस्वस्थता


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Heart Problem : हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ खाणे लगेच बंद करा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला